मोबाइल ही आता काळाची आणि माणसांची गरज बनली आहे. कारण, माहिती-तंत्रज्ञानाच्या या जगात आपला कनेक्ट राहण्यासह आपल्याला जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पोटापाण्याच्या उद्योगातही हा मोबाइल नियमित वापरला जात आहे. अशावेळी हा कितीही घातक असल्याचे वाचले तरी आपण त्याला दूर ठेऊ शकत नाहीत. मग अशावेळी एक गोष्ट पुढे येतेय ती म्हणजे काळजी घेण्याचे. जसे आपण करोना विषाणूला संपवू शकत नाहीत. पण एकमेकांची काळजी घेऊ शकतो ना. हा तसाच काळजी घेण्याचा प्रकार आहे.
अनेकांना फोन चार्जिंगवर असताना आलेल्या कॉलवर बोलायची सवय असते. मात्र, असे बोलण शक्यतो टाळा किंवा खूपच गरज असल्यास फोन चार्जिंग बंद करून मगच कॉल रिसिव्ह करा. फोनची बॅटरी पूर्ण चार्ज झाली तातडीने चार्जिंग बंद करा. रात्रभर फोन चार्ज करीत बसू नका. फोन जास्त चार्ज करून तो काही जास्त कालावधीसाठी चालणार नाही.
- तिथे मिळतेय ‘ओप्पो’वर 17 टक्क्यांपर्यंत दमदार सूट; पहा कुठे मिळेल +10% ऑफरही
- ऑफर : नो कॉस्ट EMI वरही मिळतेय सूट; पहा कुठे होऊ शकतोय HDFC कार्डवर 1500 रुपयांपर्यंत फायदा
- नाविन्यपूर्ण : सफल शेतीचा मूलमंत्र म्हणजे ‘फसल’; मोबाईलवर कळणार पिकाचे आरोग्य..!
- पाकिस्तान जिंदाबाद व मोदी विरोधाचा ‘तो’ व्हिडिओ खोटाच; शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी वापर
- ‘त्या’ आठजणांकडे आहे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व; वाचा, या जिगरबाज मंडळींविषयी माहिती
सध्या आपण सगळे शक्यतो नामांकित मोबाइल वापरतो. पण जर तुम्ही किंवा तुमचे मित्र व नातेवाईक नॉनब्रँडेड किंवा स्वस्त फोन वापरत असतील तर त्यांना समजून सांगा. कारण ते धोकादायक ठरतात. चिनी बनावटीची बॅटरी आणि छोटे-मोठे पार्ट वापरले गेलेले असे मोबाइल जास्त कालावधीसाठी टिकत नाहीत. तसेच रेडीयेषण लेव्हल यांची जास्त असू शकते.
इंटरनेट सर्फिंग व डाउनलोडिंगच्या वेळी अँटीवायरस फारसे प्रभावी नसल्याने मालवेअरचा धोका वाढतो. अशावेळी ऑपरेटिंग सीस्टीमने रेकमंड केलेल्या स्टोअरवरुनच अॅप्स इनस्टॉल करा. सुरक्षित नसलेल्या आणि सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. याचे पोर्ट सुरक्षित नसल्याने मोबाइल डेटा सहज हॅक होऊ शकतो. शक्यतो हँडसेट शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करून रेडिएशनचा धोका कमी करा. स्पीकरवर किंवा हेडफोन्स, ब्लूट्रुथचा वापर करून बोला.
रात्री झोपताना उशीखाली मोबाइल ठेवण्याची अनेकांची सवय असते. ती सवय सोडून द्या. रेंज अगदीच कमी असताना कॉलवर बोलण टाळा. फोन जर लवकर चार्ज करायचा असेल ऐरोप्लेन मोडवर टाका. चार्जिंग चालू असताना मोबाईल वापरल्यास बॅटरी लाईफ कमी होऊन जाते. मोबाईलची बॅटरी चांगली आहे की नाही हेही वेळोवेळी तपासा. त्यासाठी बॅटरीला 6 इंच वरून फेकल्यास बॅटरी थोडी बाऊन्स झाल्यास ती चांगली आहे. तर, अतिजास्त बाऊन्स झाली बॅटरी खराब होत आल्याने बदलण्याची काळजी घ्या.
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव
- म्हणून शेतकरी-सरकार बैठक ठोस निर्णयाविनाच संपली; पहा नेमके काय झालेय
पीडीएफ फाईल आपण अनेकदा डाउनलोड करतो. त्यावेळी फाईलच्या शेवटी .exe असल्यास अशी फाईल वायरसयुक्त असण्याची असते. मोबाइलमध्येही अशा फाईल असल्यास त्या तातडीने डिलीट करा. फोन हँग झाल्यावर चार्जिंगला लावून थोड्या वेळाने नॉर्मल करणे शक्य आहे. बॅटरी जास्त वेळ चालण्यासाठी मोबाईलला थंड ठिकाणी ठेवत जा. ब्लूटूथचा वापर करत नसताना ती चालू असल्यास बॅटरी कमी होते.
मोबाईल असो की कोणतेही गॅजेट्स असोत बॅटरी पूर्ण चार्ज करू न देण्यासह लो होऊन मोबाईल बंद पडणार नाही याचीही काळजी घ्या. आपल्या फोन समवेत आलेल्या चार्जरनेच शक्यतो फोन चार्ज करा. दुसऱ्या चार्जरने फोन चार्ज करून बॅटरी खराब होण्याची शक्यता वाढते. मोबाईलचा डिस्प्ले खराब होण्यापासून रोखण्यासाठी कपड़े किंवा मऊ जागेवर तो ठेवा.
संपादन : सचिन मोहन चोभे
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव