‘त्या’ ठिकाणी शिवसेनेच्या फोडाफोडीमुळं राष्ट्रवादी झाली अस्वस्थ; दिला ‘हा’ इशारा

अंबरनाथ :

राज्य पातळीवर तिन्ही पक्षांचे बरे चालले असले तरी स्थानिक पातळीवर तिन्ही पक्षात मोठी धुसफूस आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन जेव्हा निवडणूक लढायची ठरवतात त्यावेळी साहजिकच दोन उमेदवारांचा पत्ता कट होतो. विशेषकरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील दुसऱ्या फळीतील आणि स्थानिक पातळीवरील नेते नाराज असल्याचे दिसून येत आहेत. अशातच अंबरनाथ, बदलापूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्ष कविता पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून आघाडीधर्म पाळता जात नाही, असे म्हणत राष्ट्रवादी अस्वस्थ झाली आहे.

यावरून स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. ‘शिवसेनेच्या आजी माजी नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत आम्हालाही भूमिका घ्यावी लागेल’, असा इशारा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिला आहे. या विषयावर बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आशीष दामले यांनी सांगितले की, या प्रवेशाबाबत आम्ही याबाबत आमच्या वरिष्ठांना कळवले असून ते शिवसेनेच्या वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहेत. पारनेरच्या धर्तीवर येथेही महाविकास आघाडीचा समन्वय साधला जाईल. 

बदलापुरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पळवण्याचा प्रयत्न झाल्यास राष्ट्रवादीच्याही संपर्कात शिवसेनेचे अनेक आजी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही त्यांच्या प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेईल, असेही पुढे बोलताना दामले यांनी स्पष्ट केले.   

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here