कृषी व्यवसाय करण्यासाठी सरकारतर्फे मिळतंय २० लाखांचं कर्ज; ‘असा’ मिळवा लाभ

अहमदनगर :

शेतकऱ्याची प्रगती आणि कृषी आधारित व्यवसायाला चालना मिळावी म्हणून केंद्र सरकार विविध योजना आणत आहे. आर्थिक पाठबळ हे सर्वात महत्वाचे असते म्हणून कमी झंजट करून सहजपणे उपलब्ध होईल अशा प्रकारचे कर्ज सरकार देत आहे. देशभरात कृषी आधारित व्यवसायाला चांगले दिवस यावेत म्हणून केंद्र सरकार तब्बल २० लाखांपर्यंत कर्ज देत आहे.   ज्यांना स्वतःचा कृषी आधारित व्यवसाय करायचा आहे मात्र आर्थिक अडचणीमुळे शक्य नाही, अशा शेतकरी बांधवाना आता चिंता करायची गरज नाही.

कारण कृषी व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून २० लाख रूपयांपर्यंतचे कर्ज घेणे आता शक्य आहे. जे व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा शेतकरी बांधवांसाठी हे सुवर्णसंधी आहे. ३६ ते ४४ टक्क्यांपर्यंत अनुदानही मिळत आहे.

वाचा या कर्ज योजनेविषयी मुद्देसूद माहिती :-

  • कर्जाच्या रुपात मिळणारे पैसे हे अ‍ॅग्री क्लिनिक आणि अ‍ॅग्री बिझिनेस सेंटर योजनेद्वारे दिले जातील.
  • या योजनेत सहभागी होणाऱ्यांना ४५ दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाईल.
  • तुम्ही पात्र असल्याचे आढळल्यास आपल्याला नाबार्डमार्फत कर्ज मिळेल.
  • सर्वसाधारण प्रवर्गातील अर्जदारांना ३६ टक्के अनुदान दिले जाते. याशिवाय एससी, एसटी आणि महिला अर्जदारांना ४४ टक्के पर्यंत अनुदान मिळते.

अशी आहे प्रोसेस :-

  • प्रशिक्षणासाठी जवळचे कॉलेज निवडा.
  • हे प्रशिक्षण भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या संस्थेच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन, हैद्राबाद संस्थेशी जोडले गेले आहे.
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नाबार्डकडून कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here