ग्राहकांना मोठा दिलासा : ‘त्या’ शुल्कामुळे बँक ऑफ बडोदाची माघार; वाचा, काय घडला प्रकार

मुंबई :

सध्या अनेक बँका पैसे भरण्यापासून काढण्यासाठी तसेच इतर विविध बँकेच्या कामकाजासाठी शुल्क आकारणार अशा माहिती देणारे वृत्त सगळीकडे व्हायरल झाले होते. अशातच बँक ऑफ बडोदाने ठराविक व्यवहार मर्यादेनंतर पैसे भरणे किंवा काढण्यावर शुल्क लावले जाणार असल्याचे सांगितले. मात्र बँकेच्या या धोरणावर ग्राहकांनी यथेच्छ टीका केल्यामुळे तसेच या प्रकरणी अर्थ मंत्रालयाने विशेष लक्ष घातल्यामुळे सदर निर्णय बँकेने मागे घेतला आहे. त्यामुळे बँकेच्या कोट्यावधी ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

चालू खाते, कॅश क्रेडीट लिमीट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे काढणे किंवा काढण्यासाठी शुल्क लागू करणारे परिपत्रक बँकेने काढले. अशातच हे शुल्कही सामान्य माणसांना परवडणारे नव्हते. नाहकच ग्राहकांना मोठा भुर्दंड भरावा लागणार होता. त्यानंतर लोकांनी या निर्णयावर विविध माध्यमांतून टीका करण्यास सुरुवात केली. बँकेच्या या निणर्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका नाराजीचा सूर लावला. अखेरीस अर्थ मंत्रालयाने तातडीने लक्ष घातले आणि बँकेला शुल्क माघारी घायला भाग पाडल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.

तसेच ‘करोना संकट पाहता इतर बँकांनी अशा प्रकारची शुल्क आकारणी करू नये’, असेही स्पष्ट निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत.

असे लागणार होते शुल्क :-

–    एका महिन्यात तीन वेळा व्यवहार केल्यांनतर त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर १५० रुपयांचे शुल्क

–    बचत खातेदारांना देखील लागू होते हे शुल्क

–    बचत खात्यातून पैसे काढणे किंवा जमा करण्यासाठी शुल्क वसूल केले जाणार होते

–    एका महिन्यात तीन बँक व्यवहार निशुल्क असतील. त्यानंतर पैसे जमा करण्यासाठी एका वेळी ४० रुपये शुल्क द्यावे लागणार होते.

–    पैसे काढण्यासाठी १०० रुपये आकारले जाणार होते.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here