म्हणून शेअर बाजार बंद होताना निर्देशांकात झाली वाढ; गुंतवणूकदारांसाठी तज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई :

एकूण जगभरात आर्थिक संकटाची कुर्हाड कोसळली असताना आता अनेक उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येताना दिसत आहेत. मात्र युरोपीय देशात कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि अमेरिकेतील आर्थिक पॅकेजबाबत असलेली अनिश्चितता या दोन गोष्टींमुळे गुंतवणूकदारांना अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. अशातच भारतातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या रिलायन्सचे शेअर्स धडाधड कोसळले आहेत. अशी एकूण आर्थिक जगतात अनिश्चित आणि अंदाज न बांधण्याजोगी परिस्थिती असतानाही  शेअर बाजार निर्देशाकांची आगेकूच चालू आहे. मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 503 अंकांनी म्हणजे 1.27 टक्‍क्‍यांनी वाढून 40,261 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 144 अंकांनी वाढून 11,813 अंकांवर बंद झाला.      

काल दिवसभरात रिऍल्टी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र सोडता बॅंका, वाहन, धातू, सरकारी कंपन्या आणि खासगी बॅंक क्षेत्राचे निर्देशांकात वाढ झाली. या क्षेत्राच्या निर्देशांक 1 ते 3 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

बऱ्याच संदिग्ध परिस्थितीतही निर्देशांक वाढत आहेत. मात्र अमेरिकेच्या होत असलेल्या निवडणुका पाहता पुढील दोन दिवस गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहून व्यवहार करण्याची गरज असल्याचा सल्ला तज्ञांनी दिलेला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here