अफलातून : लग्नासाठी ‘तो’ गेला थेट ‘त्या’ थराला; वाचा धक्कादायक बातमी

सध्या संपूर्ण भारतात लग्न वेळेवर न होण्याची किंवा लग्नासाठी मुलगी न मिळण्याची मोठी समस्या आहे. अनेकांना हा हसण्याचा विषय वाटूही शकतो. मात्र, ही एक सामाजिक समस्या असून त्यामुळे अनेक संकट निर्माण होत असतात. केरळमधील एका युवकाने लग्नासाठी थेट वेगळ्या थराला जाण्याची किमया केली आहे.

३५ वर्षे वय होऊनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची उदाहरणे आपल्या सभोवताली खूप असतात. त्यांच्यासाठी मुलगी पाहायला जाण्याचा खेळही रंगतो. अनेकांना आपल्या ३० वर्षे वयात खूप सुंदर बायको हवी असल्याने ते तरुणींना मोठ्या निर्दयीपणे नकारही देतात. मात्र, मग लटकले की ताळ्यावर येतात.

केरळमधील ३५ वर्षीय अनीश सेबास्टियन यानेही लग्न होत नसल्याने वैतागून थेट एक पोस्टर लावले आहे. मी लग्नाळू असून मला बायको हवी असल्याच्या अर्थाचा ‘विचार’ त्याने त्या होर्डिंग्जवर दिला आहे. त्याची चर्चा आता अवघ्या देशभरात चालू झालेली आहे.

अनीश याने म्हटले आहे की, सध्या करोना कालावधीत मुलगी पाहायला जाणेही बंद झालेले आहे. आतापर्यंत त्याने अनेक मुली पाहिल्या. मात्र, त्याला आवडेल आणि कुटुंबातील सगळ्यांना परंपरागत वाटणारी अशी मुलगी न मिळाल्याने लग्न अडकले आहे. त्यामुळे हे पोस्टर लावल्याचे त्याने म्हटले आहे. नवभारत टाईम्स यांच्या शशी मिश्रा यांनी ही अफलातून स्टोरी प्रसिद्ध केली आहे.

संपादन : सचिन पाटील  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here