अशी बनवा ‘कोकोनट मैदा बर्फी’; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा

बहुतांशवेळा आपण स्वीट होममधील पदार्थ घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो परंतु थोडे माप इकडे तिकडे झाले की पदार्थची चव बदलते. आणि पदार्थ फसतो. विविध प्रकारच्या बर्फी बनवताना आपल्याकडून हे नकळत घडते. म्हणूनच आज आम्ही आपल्या घरच्या घरी टेस्टी ‘कोकोनट मैदा बर्फी’ कशी बनवायची याविषयी सांगणार आहोत.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1/2 कप मैदा
 2. 1/2 कप बेसन
 3. 1/2 कप खोबरा किस
 4. 1/2 टीस्पून वेलची पूड
 5. 1/2 कप तूप
 6. 1 कप साखर

हे साहित्य घेतले असेल तर बनवायला सुरुवात करा की…

 1. सर्व प्रथम कढई गरम करून मग त्यात तूप टाकून घ्यावे.
 2. आता त्यात खोबरा किस टाकून 1 मिनीट भाजून घेऊन मग त्यात मैदा घालून परत 2 ते 3 मिनीट भाजून घेणे. आता त्यात बेसन घालून परत5 मिनीट भाजून घेणे.
 3. आता छान भाजून झाले की यात वेलची पूड, दूध आणि साखर घालून मिक्स करणे, एकजीव करून घेणे. याच्या गुठळया पडू नये म्हणून सारखे हालवत रहाणे.
 4. आता एका प्लेटला तूप लावून त्यात हा तयार गोळा थापुन ह्याच्या वड्या पाडून घेणे.
 5. आता आपल्या वड्या तयार आहेत.

आता आपली बर्फी खाण्यासाठी तय्यार…

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here