ब्रेकिंग : पहा काय होणार अमेरिकेत; मतमोजणीला झाली सुरुवात

जगाची एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेतील मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून आता मतमोजणी सुरू झालेली आहे. काही तासांमध्ये याचा कल समजण्यास सुरुवात होणार आहे. जगभरातून दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात आहेत.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे आव्हान देत ज्यो बायडेन यांनी प्रचारात रंगत आणली होती. ट्रम्प यांच्या बेताल वक्तव्यांनी यंदाची निवडणूकही गाजली. त्याचवेळी अमेरिकेला पुन्हा एकदा मोठे बनवण्याचे स्वप्न दाखवून ट्रम्प यांनी आपण अजूनही कशातच कमी नसल्याचे अधोरेखित केले होते.

त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या नेत्याचा विजय होणार आणि कोणाला मतदार नाकारणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अनेकांनी यंदा सत्ताबदल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, मागील वेळेप्रमाणे यंदाही ट्रम्प झटका देऊ शकतात असेही अनेकांना वाटत आहे.

संपादन : सचिन पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here