मोदी सरकारने दिला ‘त्या’ बंडखोरांना झटका; पहा काय केलीय नेमकी कारवाई

भारतातून काश्मीर किंवा ईशान्ये भारतीय राज्यातील काही भाग बाहेर पाडण्यासाठी लढत असल्याचे वेळोवेळी बातम्यांतून दिसते. मात्र, त्याचवेळी आणखी एक बंडखोर गट जगभरातून पैसे मिळवून आपला वेगळा असा धर्माधिष्ठित देश स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच बंडखोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जोरदार झटका दिला आहे.

खलिस्तान नावाच्या वेगळ्या स्वतंत्र राष्ट्राची ही चळवळ आहे. त्या चळवळीचा बिमोड करण्याचे काम दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केले. नंतर त्याच बंडखोरांनी इंदिरा गांधी यांची हत्याही केली. मात्र, तरीही हा वेगळ्या देशाचा विचार असलेला समूह शांत झालेला नाही. अनेकजण त्यासाठी छुप्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यासाठी त्यांनी आता माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा आधार घेतला आहे.

अशाच पद्धतीने देशाच्या विरोधात प्रचार करून वेगळा खलिस्तान बनवण्याची इच्छा असलेल्यांच्या किमान १२ वेबसाईटवर गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने बंदी घातली आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स & आईटी याच्या आईटीएक्ट द्वारे सेक्शन ६९ अ याच्या आधाराने ही कारवाई करण्यात आलेली आहे.

SFJ4Farmers, pbteam, seva413, pb4u, sadapind या नावाच्या आणि वेगवेगळे डोमेन असलेल्या सर्व वेबसाईट आता बंदीच्या यादीत आहेत. मागील वर्षीही सरकारने किमान ४० अशाच वेबसाईटवर बंदी घातली होती.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here