म्हणून गहू उत्पादकांना बसलाय झटका; पहा काय परिणाम होणार रब्बी हंगामावर

भारतातील प्रमुख अन्नधान्य पिक असलेल्या गव्हाला यंदा युरिया वेळेवर न मिळण्याचा फटका बसायला लागला आहे. पंजाब आणि हरियाणा यासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व राजस्थान याही राज्यात गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यातल्या पंजाब राज्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

यंदा पंजाब राज्यासह उत्तर भारताच्या अनेक भागात कृषी सुधारणा विधेयकावरून वातावरण तापलेले आहे. शेतकरी या कायद्यांना विरोध करीत आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक आणि एकूण जनजीवन विस्कळीत झालेले आहे. परिणामी युरिया मिळत नसल्याने शेतकरी वेळेवर गव्हाची पेरणी करू शकलेले नाहीत.

पंजाब राज्याला एकूण १४.५० लाख टन युरिया आवश्यक आहे. मात्र, सध्या त्या राज्यात फ़क़्त ७५ हजार टन इतकाच साठा आहे. त्यामुळे यंदा गव्हाची पेरणी वेळेत न झाल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

गुजरात, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून पंजाबला युरिया आणि तर खतांचा पुरवठा केला जातो. तो यंदा बाधित झालेला आहे. त्यातच मागील युरियाचे आवंटन पोहोच झालेले नसताना नोव्हेंबर महिन्यात फ़क़्त चार लाख टन पुरवठा होणार आहे. परिणामी १ नोव्हेंबरपासून पेरणीचा हंगाम सुरू होऊ शकलेला नाही.

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here