असे बनवा कढाई पनीर; रेसिपी वाचा एका क्लिकवर

आजवर तुम्ही हॉटेलमध्ये पनीरचे अनेक पदार्थ खाल्ले असतील. त्यापैकी अनेक पदार्थ घरीही बनवायचा प्रयत्न केला असेल. मात्र कधी कधी बनवायचे प्रयत्न फसतात आणि दुसऱ्याच नवीन पदार्थाचा शोध लागतो. म्हणून आज आम्ही आपल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ ‘कढाई पनीर’ घरी बनवण्यासाठी रेसिपी सांगणार आहोत. वाचा आणि नक्कीच ट्राय करा.

साहित्य घ्या मंडळीहो…

 1. 1/2 किलो पनीर
 2. 250 ग्रॅम शिमला मिर्च
 3. 250 ग्रॅम टमाटर
 4. 1/2 वाटी काजु मगज बी पेस्ट
 5. 1 टिस्पुन खाण्याचा लाल रंग
 6. 100 ग्रॅम बटर
 7. 1 टेबलस्पुन तिखट
 8. 1 टिस्पुन हळद
 9. 1/2 टिस्पुन जिरे
 10. 1 टेबलस्पुन धणे जिरे पावडर
 11. 1 टेबलस्पुन अमुल क्रिम
 12. 1 टेबलस्पुन मसाला
 13. मीठ चवीप्रमाणेप

हे साहित्य घेतले असेल तर बनवायला सुरुवात करा की…

 1. काजु आणि मगज बी 15 मिनीट गरम पाण्यात भिजवून घ्या. टमाटर, आलं(कांदा,लसुन)ची पेस्ट करुन घ्या. मग काजु मगज बी याचीही पेस्ट करा.
 2. मग पनीर, शिमला मिर्चचे चौकौनी काप करुन घ्या. पँनमधे शिमला मिर्च थोडी परतवुन घ्या.
 3. मग कढई मधे बटर घालुन त्यात जिरे घाला. मग त्यात टमाटर आलंची पेस्ट घालुन साधारण 10 मिनीट तेल सुटे पर्यंत होऊ द्या. मग काजु, मगज बी पेस्ट मंद आचेवर होऊ द्या
 4. मग त्यात तिखट मीठ, हळद, धणेजिरे पावडर,  मसाला, रंग, पाणी घालुन उकळु द्या.
 5. आत त्यात अमुल क्रीम घाला. आता त्यात पनीर, शिमला मिर्च घाला. वरून पनीर किसुन घाला.अशा पद्धतीने चवदार पनीर कढाई तयार आहे.

संपादन : संचिता कदम  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here