अंबानींना झटका; फेकले गेले दहाव्या स्थानावर, पहा श्रीमंतांची अपडेटेड लिस्ट, अमेरिकनांचे वर्चस्व

जगातील श्रीमंतांच्या यादीत भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे नाव वेगाने पुढे सरकत होते. अनेकांना ते कधी एकदाचे पहिल्या स्थानावर जातात याचेच वेध लागले होते. मात्र, दोन दिवसांच्या मार्केट झटक्यांनी अंबानींची संपत्ती घटली आहे. परिणामी आता ते थेट दहाव्या स्थानावर फेकले गेले आहेत.

सोमवारी 8.5 टक्के इतक्या मोठ्या दणक्याने शेअर बाजारातील रिलायंस कंपनीचे भाव आपटले. परिणामी अंबानींच्या संपत्तीमध्ये 48 हजार 650 कोटी रुपये अर्थात 653 कोटी डॉलर इतकी घट झाली. त्यामुळे पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत असलेले अंबानी थेट दहाव्या स्थानावर फेकले गेले आहेत. या दहा जणांच्या यादीत अमेरिकन उद्योजकांचे वर्चस्व आहे. आठजण अमेरिकन असून फ़क़्त एक फ्रान्सचा तर, दुसरे अंबानी हे भारतीय आहेत.

अपडेटेड रिचेस्ट टायकून यांची लिस्ट अशी :

1. जेफ बेजोस: 17800 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
2. बिल गेट्स: 12000 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
3. एलॉन आर मस्क: 10000 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
4. मार्क जुकरबर्ग: 9900 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
5. बरनार्ड अरनाल्ट: 8630 कोटी डॉलर, फ्रांस
6. वॉरेन बफे: 7720 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
7. लैरी पेज: 7680 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
8. सर्जेई ब्रिन: 7440 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
9. स्टीव बाल्मर: 7340 कोटी डॉलर, यूनाइटेड स्टेट
10. मुकेश अंबानी: 7110 कोटी डॉलर, भारत

संपादन : सचिन मोहन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here