रिलायंस म्हणजे भारतीय शेअर बाजारातील दादा कंपनी. याच कंपनीचे शेअर ४२ टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता व्यक्त होणारी बातमी सध्या ट्रेंडमध्ये आहे. कारण, Macquarie या जागतिक ब्रोकरेज संस्थेनं रिलायन्सच्या शेअरबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे.
त्याचवेळी बाजारात सध्या मागील दोन दिवसांपासून सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची ही कंपनी आपटी खात आहे. अशावेळी अंबानींच्या संपत्तीचा आणि त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या अनेकांच्या पैशांचे आकडे कमी होत आहेत. त्यामुळे जगभरातील प्रमुख ब्रोकरेज संस्था या शेअरबाबत काय भाकीत व्यक्त करतात त्याची ही माहिती.
- सीएलएसए यांनी कंपनीवर विश्वास व्यक्त करीत २२५० रुपये इतका लक्षांक ठेवला आहे.
- एडलवाइज यांनीही म्हटले आहे की, एकूण येणारी गुंतवणूक आणि कमी झालेले कर्ज लक्षात घेता कंपनीला चांगले भविष्य आहे.
- गोल्डमैन सैक्स यांनीही शेअर खरेदी करण्याचा सल्ला देताना थेट २३३० रुपये इतका लक्षांक असल्याचे म्हटले आहे.
- एमके ग्लोबल यांनीही एडलवाइज यांच्यासारखे हे शेअर होल्ड करण्याचा सल्ला देत २१०५ – १९७० इतका लक्षांक दिला आहे.
- तिथे मिळतेय ‘ओप्पो’वर 17 टक्क्यांपर्यंत दमदार सूट; पहा कुठे मिळेल +10% ऑफरही
- ऑफर : नो कॉस्ट EMI वरही मिळतेय सूट; पहा कुठे होऊ शकतोय HDFC कार्डवर 1500 रुपयांपर्यंत फायदा
- नाविन्यपूर्ण : सफल शेतीचा मूलमंत्र म्हणजे ‘फसल’; मोबाईलवर कळणार पिकाचे आरोग्य..!
- पाकिस्तान जिंदाबाद व मोदी विरोधाचा ‘तो’ व्हिडिओ खोटाच; शेतकरी आंदोलनास बदनाम करण्यासाठी वापर
- ‘त्या’ आठजणांकडे आहे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व; वाचा, या जिगरबाज मंडळींविषयी माहिती
अंबानी यांनी एप्रिल २०२० नंतर बाजारातून २.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवताना १.७६ कोटींचे कर्ज भरल्याचे इकॉनॉमिक टाईम्स यांनी बातमीत म्हटले आहे. एकूण जगभरातील कंपन्यांना करोना कालावधीत फटका बसला आहे. त्याच कालावधीत अंबानींच्या कंपनीलाही याची झळ बसली आहे.
त्यामुळे कंपनीचे शेअर सध्या पडत आहेत. मात्र, एकूण परिस्थिती लक्षात घेता त्यात इतकी पडझड होईल की नाही याची ब्रोकरेज फर्म आणि गुंतवणूक विश्लेषकांना साशंकता वाटत आहे. मात्र, तरीही आपण गुंतवणूक करताना किंवा शेअर होल्ड करताना आपला अभ्यास करून निर्णय घ्यावा. कारण सल्लागार काही कशाचीही 100 टक्के हमी देत नाहीत की..!
संपादन : सचिन मोहन चोभे
- त्यामध्ये भारताची फ़क़्त ओएनजीसी; युरोप व अरबस्तानातील दहा कंपन्यांचा वाटा 45 टक्के.!
- पांढरेच नाही तर रंगीतही सोने; पुन्हा फुलणार भारतात रंग, पहा नेमके काय संशोधन झालेय ते
- पुणे, वडूज, सांगलीत ज्वारीने खाल्लाय भाव; वाचा महाराष्ट्रात कुठे व किती आहे भाव
- टोमॅटो मार्केट अपडेट : पहा, आजचे ताजे बाजारभाव
- कांदा मार्केट अपडेट : पहा, आजचे लाल व उन्हाळचे भाव