म्हणून जागेची मालकी बदलते का; शिवसेनेचा भाजपला सवाल, ‘त्यावरून’ वाद पेटला

मुंबई :

आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानंतर आता आता एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केलेली असताना केंद्राने हे काम थांबवण्यास सांगितले असून ज्या जागेवर हे काम चालू आहे त्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री बदलले की जागेची मालकी बदलते का?’ असा सवाल महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

त्या म्हणाल्या की, कांजूरमार्ग कारशेडची जागा राज्याच्याच मालकीची; देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना तसं प्रतिज्ञापत्र दिलंय. मुख्यमंत्री बदलले की जागेची मालकी बदलते का?

दरम्यान याच विषयावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही आक्रमक झालेले आहेत. ते म्हणाले की, कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही. केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here