तिघाडी सरकार म्हणजे लटकवा, अटकवा आणि भटकवा; ‘या’ भाजप नेत्याचा टोला

मुंबई :

आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. त्यानंतर आता आता एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केलेली असताना केंद्राने हे काम थांबवण्यास सांगितले असून ज्या जागेवर हे काम चालू आहे त्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! मेट्रो कारशेडचे असेच चालले’, असे म्हणत भाजप आमदार आशिष शेलार यांनी मविआ सरकारवर जळजळीत टीका केली आहे.

पुढे बोलताना शेलार म्हणाले की, ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही म्हणाले स्पष्ट केले होते की, हा निर्णय घेण्यामागे सरकारचा कु-हेतू आहे. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्र यामुळे मुंबईकरांना त्रास होतो आहे. तिघाडी सरकारने अहंकारी वृत्तीने घेतलेला निर्णय मुंबईकरांना त्रासदायक ठरणार आहे.

‘वैयक्तिक द्वेष करून राज्य कधीच चालवता येत नाही हे ठाकरे सरकारने ध्यानात घेऊन आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा त्वरित थांबवावा’, अशी जहरी टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान आदित्य ठाकरेंनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत म्हटले की, कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही. केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here