‘त्या’वरून भाजप नेत्याची जहरी टीका; ठाकरे सरकारने आपली अब्रू, जनतेचे हाल आणि पैशांचा चुथडा…

मुंबई :

मेट्रो कारशेडवरून आजी आणि माजी मुख्यमंत्री एकमेकांना भिडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयानुसार आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. या कामाला आता एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केलेली असताना केंद्राने हे काम थांबवण्यास सांगितले असून ज्या जागेवर हे काम चालू आहे त्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वैयक्तिक द्वेष करून राज्य कधीच चालवता येत नाही हे ठाकरे सरकारने ध्यानात घेऊन आपली अब्रू, जनतेचे हाल आणि तिजोरीच्या पैशांचा चुथडा त्वरित थांबवावा’, अशी जहरी टीका भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

‘दुसऱ्याच्या जीवावर संकल्प सोडू नये’, असा टोलाही पुढे त्यांनी हाणला आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनीसुद्धा आक्रमक भूमिका घेत म्हटले की, कांजूरमार्गमध्ये सुरू असलेलं काम थांबणार नाही. केंद्राकडून राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठवण्यात आलेल्या पत्राची मला कल्पना आहे. पण ती जागा केंद्राच्या मालकीची नाही, तर राज्य सरकारच्या मालकीची आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here