‘नर्मदा डॅम’जवळ पहा ‘सरदार स्टॅच्यू’; आणि इतरही गोष्टींचा आनंद घेण्याची असेल लिबर्टी

फिरायला, भटकायला, नवीन काहीतरी पाहायला आणि मुख्य म्हणजे शिणवटा हलका करायला जायची वाट आपण सगळेच पाहतोय की. कारण, करोना विषाणूमुळे आता आपण सगळेच लॉकडाऊन झालोय. मित्र-मैत्रिणींनो, हा लॉकडाऊन उघडला की फिरायला जायला एक खास ठिकाणी जाण्याचा सल्ला द्यायला आम्ही हा लेख लिहून नसती उठाठेव करीत आहोत. तर मग वाचा माहिती.

भारताचे पहिले गृहमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदेच्या तीरावर आहे. ‘नर्मदा डॅम’च्या परिसरात हा मोठा पुतळा पाहून सरदारांना नमस्कार करण्यासह इतरही अनेक ठिकाणे पाहण्याची संधी पर्यटकांना आहे. १३५ मीटर उंचीच्या या पुतळ्यात जाऊन सभोवतालचे निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी नक्कीच साधा.

यासह इथे सरदार सरोवर हा डॅम आहे. जगातील एक प्रमुख असे हे कॉंक्रीट ग्रॅव्हिटीचे धरण आहे. १.२ किलोमीटर लांब अशी या धरणाची भिंत असून मध्यभागी त्या भिंतीची उंची १६३ मीटर आहे. याला असलेल्या ३० रेडियल गेटचे वजन ४५० टन इतके आहे.

इथे आपणास आनंद देणाऱ्या इतर गोष्टी अशा :

  1. रिव्हर क्रुझ : नदीतून रॉयल क्रुझवर बसून नदीचा फेरफटका मारण्यासह सरदारांचा पुतळा नदीतून खूप जवळून पाहण्याची संधी याद्वारे मिळते.
  2. रिव्हर राफ्टींग : सुमारे 5 किलोमीटर लांब अशा नदीतून रिव्हर राफ्टींग करण्याची संधी.
  3. निवडुंग गार्डन : जगातील अनेक प्रकारचे कॅक्टस एकाच ठिकाणी पाहण्याची संधी. जगभरातील सुमारे १७ देशांतील ३५० प्रकारचे निवडुंग इथे पाहायला मिळतात.
  4. चिल्ड्रेन न्युट्रिशन पार्क : जगातील अशी ही पहिलीच थीम पार्क आहे. न्युट्री एक्स्प्रेस नावाची इथे खेळण्याची ट्रेन आहे.
  5. जंगल सफारी : निसर्गाच्या सानिध्यात जगण्याची संधी देणारे विशालकाय असे जंगल सफारी पार्क आहे. ५ लाख ५८ हजार २८४ वर्ग किलोमीटर इतके मोठे असे हे जंगल आहे.
  6. फुलपाखरू गार्डन : बटरफ्लाय अर्थात फुलपाखरे हा आपल्या सगळ्यांचा विक पॉईंट. इथेही असेच आपल्याला भावणारे फुलपाखरू गार्डन आहे.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here