आजही रिलायन्सचा शेअरमध्ये घसरण; वाचा, अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीचा कसा झाला बाजारावर परिणाम

मुंबई :

रिलायन्सचा नफा आणि रिलायन्समधील गुंतवणूक सातत्याने वाढत असली तरी रिलायन्सला काल सकाळी मोठा झटका बसला आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर्स धडाधड कोसळले. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडल्याने एका झटक्यात Reliance ला झाले 68093 कोटींचे नुकसान झाले आहे. आजही सलग दुसऱ्या दिवशी रिलायन्सचा शेअरमध्ये घसरण झाली आहे. गेल्या पाच महिन्यात पहिल्यांदाच शेअरमध्ये मोठी घसरण झाली. तसेच भारती एअरटेल, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे.

दरम्यान आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. आर्थिक,व्यावसायिक क्षेत्रासह साऱ्या जगाचे लक्ष अमेरिकेकडे लागलेले आहे. अमेरिकेतील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी काल समोर आली आहे. सदर आकडेवारी ही दिलासादायक असल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. परिणामी बाजारात तेजी दिसून येत आहे.

आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, एचडीएफसी बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, पॉवरग्रीड, एल अँड टी, एनटीपीसी, एचडीएफसी, महिंद्रा, मारुती यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली असून आजच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर तेजीत आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सध्या ३६१ अंकांनी वधारला असून तो ४०११९ अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०७ अंकांनी वधारून ११७७६ अंकावर ट्रेड करत आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here