सासू-सुनेच्या नात्यावरील हे भन्नाट मराठी जोक्स; नक्कीच वाचा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा

1. सासूबाई – हे तुझ्या आईचं घर नाही नीट राहायचं
सून – हे तुमच्या तरी आईचं घर कुठे आहे तुम्ही पण नीट राहायचं 

2. नवी नवरी सासूच्या पाया पडते
सासू – सुखी राहा
सून – तुम्ही राहू देणार का ?

3. हे बघा सासूबाई
तुमच्या  मुलाला त्याच्या आईच्या हातचंच खायला आवडतं
तर मग रोज आता जेवण तुम्हीच बनवा 

4. आपली प्रशंसा आपण स्वतःच करायला हवी
वाईट बोलण्यासाठी  तर सासू आहेच

5. साधारण 1990 मध्ये सुना घाबरत होत्या की सासू कशी मिळेल
2020 मध्ये सासू घाबरते सून कशी मिळणार? किमान मुलगी तरी असेल ना?

6. भावी सासू – मी तुझं मराठी ऐकल्यावरच ठरवेन की तू माझी सून  होण्याच्या लायकीची आहेस की नाही? तुझं शिक्षण किती?
मुलगी – नेत्र नेत्र चहा 
भावी सासू – म्हणजे काय?
मुलगी – आयआयटी
सासू अजून कोमातच आहे 

7. सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार. सूर्य माझ्या आधी झोपायला जातो ते पण बघत जा जरा 

8. सासू – सुनबाई हात मोकळे चांगलं नाही वाटत
सून – मोबाईल चार्जिंगला लावला आहे आई
सासू – अगं भवाने, बांगड्यांबद्दल बोलते आहे मी 

9. पुणेरी सून
सून – सासुबाई तुमचे सगळे दागिने मला द्या
सासू – मग मी काय घालू?
सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला
उत्तम आरोग्य हाच खरा दागिना 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here