रिलायन्सच्या शेअरची अशी असेल परिस्थिती; वाचा ‘या’ ब्रोकरेज संस्थेचा धक्कादायक अंदाज

मुंबई :

रिलायन्सचा नफा आणि रिलायन्समधील गुंतवणूक सातत्याने वाढत असली तरी रिलायन्सला काल सकाळी मोठा झटका बसला आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर्स धडाधड कोसळले. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडल्याने एका झटक्यात Reliance ला झाले 68093 कोटींचे नुकसान झाले आहे. 

एकूण शेअर बाजारात देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे म्हणजेच रिलायन्सचे शेअर्स अचानक का कोसळले, याची चर्चा चालू आहे. हे नुकसान होण्यामागे सप्टेंबर तिमाहीत रिलायन्सच्या नफ्यात झालेली घट कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच Macquarie या जागतिक ब्रोकरेज संस्थेनं रिलायन्सच्या शेअरबाबत धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे.

Macquarie ने दिलेल्या माहितीप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ४२ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला ‘underperform’ चे रेटिंग Macquarie च्या मते रिलायन्सचा शेअर ११९५ रुपयांपर्यंत खाली येईल.

रिलायन्स जिओमधील हिस्सा विक्री करून रिलायन्स इंडस्ट्रीजला त्यांनी कर्जमुक्त केले होते. मात्र पेट्रोकेमिकल्स व्यवसायात झालेली पिछेहाट, टाळेबंदीमुळे इंधन मागणीत झालेली प्रचंड घट , रिलायन्स रिटेल- फ्युचर ग्रुप व्यवहारावर सिंगापूर लवादाची रोख यासारख्या घडामोडी रिलायन्स समूहाच्या वाढीमध्ये अडथळा ठरतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here