नगरमधील भाजपचे अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत; ‘या’ मंत्र्यांचा दावा

अहमदनगर :

सध्या नगर भाजपामध्ये सर्व एकही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. वरिष्ठांनी येऊन मिटवण्याचा प्रयत्न केला असला तरीही परिस्थिती अद्याप ‘जैसे थे’च आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर नगरमधील भाजपच्या माजी खासदारांनी महाराष्ट्राच्या भाजप नेतृत्वावर शंका घेतली होती. तसेच नगर भाजप जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्यात असलेला दुरावा राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील;, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

पुढे बोलताना तनपुरे यांनी स्पष्ट केले की, भाजपकडून हे सरकार लवकरच पडेल असं बोललं जातं आहे. मात्र, आमचे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार यात कुठलीही शंका नाही. पाच वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण होतील यामुळेच त्याच्या पुढली पाच वर्ष सुद्धा आमचंच सरकार असेल.

नेमकं काय चालू आहे नगर भाजपमध्ये :-

  • भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
  • श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे.
  • माजी खासदार दिलीप गांधी यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षनेतृत्वावर शंका घेतली.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here