इम्युनिटी आणि स्फूर्तीसाठी वाचा ही महत्वाची माहिती; कारण विषय आहे फिटनेसचा

सध्याच्या करोना कालावधीत सर्वात परिचित असलेले शब्द म्हणजे फिटनेस आणि इम्युनिटी. कारण, करोनावर लस नसल्याने आता आरोग्यदायी आणि निरोगी राहण्यासाठी फ़क़्त याच दोन्ही घटकांची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने जगताना आज आपण पाहणार आहोत की, इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि स्फूर्तीसाठी आपण आहारात कोणत्या पद्धतीने खाणे आवश्यक आहे. खेळाडूंनाही याचा त्यांचा स्टॅमिना वाढवण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने हातपाय पसरलेले आहेत. अशावेळी केलेला लॉकडाऊनही खूप उपयोगी ठरलेला नाही. देशभरात एकाच पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करताना सूक्ष्मपणे नियोजन करण्यात प्रशासन कमी पडल्याने हा आजार फोफावत आहे. आता तर आपण त्याच्याच समवेत जगण्याची मानसिक तयारी ठेवली आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती याबाबतची चर्चा सगळीकडे होत आहे. जागतिक आरोग्य संघटना व इतर संशोधन संस्थांच्या डॉक्टरांनीही इम्युनिटीवर फोकस करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी आहारातही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. वारंवार आपण ऐकतोय आणि वाचतोय की ‘व्हिटॅमिन सी’ अर्थात क जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ‘एफएसएसएएआय’ यांनीही व्हिटॅमिन सी यासाठी समृद्ध असलेल्या सुपरफुड्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

त्यामध्ये आवळा, संत्रा, पपई, ढोबळी मिरची, पेरू आणि पपई ही फळे खाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. कारण, करोना झालेल्या मधुमेही आणि हृदय रोगाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तसेच करोना झाला याच्या भीतीनेही अनेकांचा मृत्यू होत असल्याचे दिसते अशावेळी वजन जास्त किंवा कमी असणाऱ्यांच्या इम्युनिटीमध्ये समस्या असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. उंची आणि वजन यांचे योग्य प्रमाण राखून आपली इम्युनिटी पॉवर वाढू शकते. तसेच मद्य आणि धुम्रपान यांचे सेवन करणाऱ्यांचेही इश्यू आहेत.
यासह काहीबाही जंक फूड खाणे आणि शरीराला आवश्यकतेनुसार पोषण न मिळण्यासह वेदनाशामक औषधांचा अतिरिक्त वापर केल्यानेही इम्युनिटी कमी होते.

मुख्य म्हणजे जास्त टेन्शन घेणे आणि खाण्यापिण्याकडे त्यातही वेळेकडे अजिबात लक्ष न देणे, झोप पूर्ण न करणे, व्यायाम न करणे आणि शरीराला आराम न देणे यामुळेही शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतो. परिणामी इम्युनिटी पॉवर कमी होते. आशावेळी इम्युनिटी पॉवर वाढवायला खूप काही भव्य दिव्य करावे असे काहीही नाही. सर्व प्रकारच्या भाज्या, फळे आणि प्राणिज प्रथिने यांच्या सेवानातूनही आपली इम्युनिटी सहजपणे वाढू शकते.

काळा चहा अर्थात डीकाशीन आणि ग्रीन टी यांचे रोज एक-दोन कप सेवन इम्युनिटीसाठी चांगले असते. मात्र, याने इम्युनिटी वाढते म्हणून अतिरिक्त आणि बेसुमार सेवन करून फायदा कमी आणि तोटा जास्त होऊ शकतो. योग आणि व्यायाम यामुळे बॉडी डीटॉक्स होते. कच्चा लसून हेही औषधाचे काम करते. यामधील अ जीवनसत्व, सल्फर आणि जिंक यामुळे इम्युनिटी वाढते. वजन नियंत्रित ठेवण्यासह शतावरी, अश्वगंधा, शिलाजित, तुळस आणि हळद इत्यादी औषधी घटकांचे सेवन करावे.

विटामिन डी यामुळे हृद्याचे रोग दूर होऊन हाडे मजबूत होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे नवजात बालकांसाठी आईचे दुध हे एक उत्तम रोगप्रतिरोधक शक्ती वाढवणारे घटक आहेत. त्यामुळे बालकास एलर्जी, ताप, जुलाब आणि इन्फेक्शन होत नाही. दररोज आठ-दहा बादाम खाणे, दह्याचे सेवन, आंबट फळे, अननस आणि संत्री अशी फळे खाणे आदि उपायांनी इम्युनिटी वाढते. यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रोल वाढून ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे, ड्राय फ्रुट्स, ब्रोकली आदींचे सेवनही करा. यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम असतात. जसे की पालकामध्ये असलेले फोलिक एसिड शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी आणि जुन्या पेशी सदृढ करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच यामधील फाइबर, आयरन एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी हेही शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here