WHOचे जनरल डायरेक्टरच झाले क्वारंटाइन; वाचा, काय झाला प्रकार

दिल्ली :

संपूर्ण जगाला आरोग्याचे सल्ले देणारे तसेच संपूर्ण जगाला आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करणारे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेडरोस अधानोम गेब्रियेसस यांनी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. अनेक युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. यावेळी अनेक लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अशातच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

WHO चे डायरेक्टर जनरल टेडरोस अधानोम गेब्रियेसस यांनी स्वतः ट्वीट करत सांगितले की, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या मी संपर्कात आल्यानं स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन केलं आहे. घरातून काम पाहात आहे.

दरम्यान काल महाराष्ट्रात 5369 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 3726 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1514079 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 125109 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.92% झाले आहे.

कोरोनाची लस कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारत बायोटेक कंपनीची लस दुसऱ्या तिमाहीत तर सीरम इन्स्टिट्यूटला इमरजन्सी वापरण्याचा परवाना मिळाल्यास डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. WHO च्या डायरेक्टरना सेल्फ क्वारंटाइन व्हावं लागल्यानं काहीसं चिंतेचं वातावरण देखील आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here