म्हणून एका झटक्यात Reliance ला झाले 68093 कोटींचे नुकसान; शेअर मार्केटमध्ये झाली ‘ही’ गडबड

मुंबई :

रिलायन्सचा नफा आणि रिलायन्समधील गुंतवणूक सातत्याने वाढत असली तरी रिलायन्सला आज सकाळी मोठा झटका बसला आहे. सोमवारी म्हणजेच आज सकाळी बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर्स धडाधड कोसळले. एकूण शेअर बाजारात देशातील सर्वात मोठ्या कंपनीचे म्हणजेच रिलायन्सचे शेअर्स अचानक का कोसळले, याची चर्चा चालू आहे. तब्बल ६ टक्क्यांनी शेअर पडल्याने एका झटक्यात Reliance ला झाले 68093 कोटींचे नुकसान झाले आहे.

हे नुकसान होण्यामागे सप्टेंबर तिमाहीत रिलायन्सच्या नफ्यात झालेली घट कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सप्टेंबर तिमाहीत रिलायन्सला झालेली घट समोर येताच शेअरवर त्याचा परिणाम जाणवला. सप्टेंबर तिमाहीत कंपनीच्या नफ्यात र्ब्ब्ल 15 टक्क्यांची घट झाली असल्याचे समोर आले.

बीएसईसह एनएसईवरदेखील शेअर्समध्ये पडझड झाली. या एका पडझडीमुळे रिलायन्सला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. बीएसईवर कंपनीचा शेअर 5.54 टक्क्यांनी घटून 1940.50 रुपयांवर आला होता. तर एनएसईवरदेखील 5.57 टक्के शेअर पडून 1940.05 वर आला होता. या पडझडीमुळे कंपनीटे बाजारमुल्य एका झटक्यात 68093.52कोटींनी कमी झाले. ते सध्या 13,21,302.15 कोटी रुपये झाले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here