असे बनवा खुसखुशीत आणि चवदार दराबा लाडू; रेसिपी वाचा एका क्लिकवर

हे लाडू महाराष्ट्रात बनवले जात नाहीत. टेस्ट मे बेस्ट असलेले हे लाडू महाराष्ट्रातील काही शहरात तेही मोजक्याच ठिकाणी भेटतात. मध्य प्रदेशात विशेषतः बर्हाणपुर भागात हे लाडू केले जातात. अतिशय खमंग,मऊ, लुसलुशीत असा हा लाडू असतो. मुळ लाडू हा गहू भिजवून रवा काढून केला जातो मात्र आपण हा रवा वापरून तयार केला आहे.

साहित्य घ्या मंडळीहो…

  1. 1/2 किलो बारीक रवा
  2. 1/2 किलो मैदा
  3. 1/2 किलो पिठीसाखर
  4. 400 ग्रॅम साजुक तूप
  5. 10 ग्रॅम वेलचीपूड

हे साहित्य घेतले असेल तर वाट कसली बघताय लागा की बनवायला

  1. प्रथम रवा कोरडा च खमंग लालसर भाजून घ्या. नंतर मैदा कोरडा भाजून घ्या.
  2. रवा, मैदा भाजून झाल्यावर त्यात 400 ग्राम तुप घालून एकजीव करून पुन्हा थोडे भाजा.
  3. मिश्रण थंड करत ठेवा.नंतर पिठीसाखर आणि वेलची पूड घालून खुप मळा.
  4. खुप मळल्यावर लाडू वळा.

आपले दराबा लाडू खाण्यासाठी तय्यार  …

संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here