तुम्हालाही आहेत ‘ही’ लक्षणे; तर ओळखून घ्या तुमचीही रोगप्रतिकारशक्ती आहे कमी

जेव्हापासून कोरोनाचा शिरकाव मानवजातीत झाला तेव्हापासून रोगप्रतिकारशक्तीला अनन्यसाधारण महत्व आले आहे. आता बाजारातही अनेक उत्पादने अशी मिळत आहेत की ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, असा दावा केला जातो. मात्र तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे की जास्त हे ओळखण्यासाठी काही ठराविक लक्षणे असतात. आज आम्ही काही लक्षणांविषयी सांगणार आहोत. जर ही लक्षणे तुम्हाला असतील तर समजून घ्या की तुमचीही रोगप्रतिकारशक्ती कमी आहे.

ही आहेत लक्षणे :-

१) सतत पोटात दुखणं, अॅसिडिटीचा त्रास होणं, पोटात गॅस निर्माण होणं, बद्धकोष्ठता, जुलाब हे तुमच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असण्याचं लक्षण आहे.

२)वारंवार सर्दी, खोकला होणं हे प्रतिकारशक्ती कमी असल्याचं लक्षण आहे.

३)रोग प्रतिकार शक्ती कमी असण्यामुळे तुमचे सांधे सतत दुखतात, वारंवार पोट बिघडतं अथवा भूक मंदावते.

४)वर्षांतून दोनदा अथवा अधिक वेळा सायनसचा त्रास होणं हे एक गंभीर आजारपणाचं लक्षण आहे. यामागचं कारण तुमच्या शरीरात प्रतिकार शक्ती कमी असणं हेही असू शकतं.

५)जर तुमच्या साध्या कापणे, चिरणे, भाजणे अशा छोट्या-मोठ्या जखमा पटकन बऱ्या होत नसतील तर तुमच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असू  शकतो.

६) तुम्ही खूप दिवस आजारी पडत असाल तर तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे.

७) तुम्हाला वारंवार फंगल इनफेक्शन होत असेल रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याचं हे आणखी एक लक्षण आहे.

८) जर तुम्हाला दर दोन ते तीन महिन्यांनी अथवा वर्षातून चार ते सहा वेळा कानाचे इनफेक्शन होत असेल तर तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती कमी असण्याचं एक लक्षण आहे.

९) तुम्हाला सतत ताणतणाव जाणवत असेल किंवा जर तुम्हाला वारंवार डोळ्यांचे इनफेक्शन होत असेल तर हेही लक्षण आहे.

(सदर माहिती संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या डॉक्टरांशी सल्ला-मसलत करावी. प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या शरीराला सारख्याच प्रमाणात लागू होते असे नाही. त्यामुळे काहीही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या मतांशी ‘कृषीरंग’चा संबंध नाही.)

संपादन : संचिता कदम  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here