महाराष्ट्रात येणार ३५ हजार कोटींची गुंतवणूक; पहा कोणत्या कंपनीने कितीची केलीय तयारी

राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य असून आता १५ कंपन्यांनी ३४ हजार ८५० कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्याचे नियोजन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या.

या सामंजस्य करारामुळे राज्यात सुमारे २३ हजार १८२ रोजगार उपलब्ध होतील असे राज्य सरकारने म्हटले आहे. यावेळी यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य सचिव श्री संजय कुमार, एफडीआय शेरपा प्रधान सचिव श्री भूषण गगराणी उद्योग प्रधान सचिव श्री वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन आणि गुंतवणूकदार उपस्थित होते.

सामंजस्य करार स्वाक्षरी सोहळा यामधील कंपन्यांची संक्षिप्त माहिती

नावदेशक्षेत्रप्रस्तावित
गुंतवणूक
(
रुकोटीमध्ये)
प्रस्तावित
रोजगार
मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया प्रा. लि.जपानइलेक्ट्रॉनिक्स490350
ब्राईट सिनो होल्डिंग प्रा. लि.भारतइंधन तेल व वायू१,८००१,५७५
ओरिएंटल ऍरोमॅटिक्सभारतरसायने265350
मालपानी वेअरहाऊसिंग अँड इंडस्ट्रिअल पार्कभारतलॉजिस्टिक्स950८,०००
एव्हरमिंट लॉजिस्टिक्सभारतलॉजिस्टिक्स354२,१००
पारिबा लॉजिस्टिक्स पार्कभारतलॉजिस्टिक्स381२,२००
ईश्वर लॉजिस्टिक्स पार्कभारतलॉजिस्टिक्स395२,२००
नेट मॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रा. लि.भारतडेटा सेंटर१०,५५५575
अदानी एन्टरप्राइजेस लि.भारतडेटा सेंटर५,०००१,०००
मंत्र डेटा सेंटरस्पेनडेटा सेंटर१,१२५80
एसटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स इंडिया प्रा. लि.भारतडेटा सेंटर825800
कोल्ट (डेटा सेंटर होल्डिंग्स इंडिया एलएलपी)युकेडेटा सेंटर४,४००100
प्रिन्स्टन डिजिटल ग्रुपसिंगापुरडेटा सेंटर१,५००300
नेस्क्ट्राभारतडेटा सेंटर२,५००२,०००
इएसआर इंडियासिंगापुरलॉजिस्टिक्स४,३१०१,५५२
   ३४,८५०२३,१८२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here