ओबीसी – मराठा वाद हे ‘त्यांचे’ राजकीय षड्यंत्र; अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

मुंबई :

मराठा आरक्षणावरून अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी याविषयी धक्कादायक आरोप केले आहेत. ‘ मराठा समाजाला मुद्दाम बदनाम करण्याचा डाव आहे. ओबीसी आणि मराठा वाद हे काही पक्षांचं राजकीय षड्यंत्र काही पक्षाचे आहे’, असा आरोप त्यांनी केला आहे.

‘मराठा आरक्षणाला कोर्टात तात्पुरता स्टे मिळाला. ही काही माझी नामुश्की नाही. आरक्षणाला सरकारने नाही, कोर्टाने स्थगिती दिली आहे. आणि आता सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आज कोर्टाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीशांनी आरक्षणाचा विषय घटनापीठासमोर लवकरात लवकर मांडला जाईल, असं सांगितलं आहे. आता सरकारला विरोध करण्यापेक्षा आणि आंदोलन करण्यापेक्षा कोर्टात मदत करावी’, असेही आवाहन पुढे बोलताना चव्हाण यांनी केले आहे.  

मराठा आरक्षण कोर्टात आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवणं योग्य नाही. ती तातडीने पूर्ण केली पाहिजे. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून कॅबिनेटने तातडीने निर्णय घ्यावा ही आपली भूमिका असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट अधिक माहिती सांगताना स्पष्ट केले.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here