अबबब… मोदींच्या राज्यातच मोठ्ठा कोरोना घोटाळा; वाचा, कसे खेळले जातेय जीवाशी

जामनगर :

कोरोना अद्यापही भारतात अपेक्षित आटोक्यात आलेला नाही. दरम्यान आता युरोपीय देशातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्ण वाढतच आहेत. जगभरात अशी गंभीर परिस्थिती असताना गुजरातच्या राजकोट आणि जामनगरमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी दाखविण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असले तरीही ते निगेटिव्ह दाखविण्याचा विचित्र डाव रचला जात आहे. हा थेट जीवाशी खेळण्याचा प्रकार चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जन्मभूमीत म्हणजेच गुजरातमध्ये घडतो आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तेथील गुजरातमधील आरोग्य अधिकारीच या खेळात सामील आहेत.  आरोग्य विभागाच्या काही ठराविक अधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना निगेटिव्ह दाखविण्याची तंबी कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे गुजराती बांधवांना कुणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न पडला आहे.

दरम्यान राज्य सरकारांवर गंभीर आरोप लावणाऱ्या थायरोकेअर लॅबच्या सीईओ वेलुमनी यांनी दिलेल्या माहितीनुसार काही राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे.

दरम्यान मोदींच्या गुजरातमधील या हेराफेरीचे दैनिक लोकमतने दैनिक भास्करच्या हवाल्याने दिले आहे. राजकोट मनपा, राजकोटमधील गावे आणि जामनगर या तीन भागातील कोरोना रुग्णांचे आकडे कमी दाखविण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबण्यात आले. यामध्ये पालिका आयुक्तांपासून आरोग्य खात्याचे मोठमोठे अधिकारी सहभागी असल्याचे आढळले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here