बापरे… किम जोंगचा नवा फतवा; ‘त्या’ लोकांना गोळ्या घाला

प्योंगप्यांग :

कधीही, काहीही आत्मघातकी निर्णय घेणारा, प्रचंड शिस्त पाळणारा, मनाला आल्यावर कुणाच्याच जीवाची पर्वा न करणारा अशी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची ओळख जगाला आहे. आता अशातच किम जोंगने कोरोनाच्या भीतीपोटी एक नवीन नियम काढला आहे. उत्तर कोरियाच्या बाजूने सीमा सुरक्षा वाढवत  देशांच्या सीमांजवळ बफर झोन तयार करण्यात आले आहेत. या बफर झोनमध्ये परवानगी न घेता फिरणाऱ्यांना कोणताही इशारा न देताना थेट गोळी घालण्याचे आदेश किमने दिलेले आहेत.

हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे तरीही किमने ते आदेश दिलेले आहेत. देशामध्ये कठोर निर्बंध लादल्यामुळे कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. आता दुसरी लाट आल्याने आपल्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची किमला भीती वाटू लागली आहे म्हणूनच त्याने हे आदेश दिलेले आहेत.

रेडिओ फ्री एशियाच्या प्रतिनिधींनी बफरझोनबाबत एका अधिकाऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीपासून आम्ही सर्वोच्च आदेशानुसार उत्तर कोरिया आणि चीनच्या सीमेजवळच्या रयांगगंग प्रांतामध्ये भूसुरुंग पेरत आहोत. उत्तर कोरियाच्या लष्कराला हे सर्व करण्यासाठी १५ दिवसांहून कमी कालावधी लागला. पण यादरम्यान झालेल्या एका स्फोटामध्ये अनेक सैनिक जखमी झाले तर काहींचा मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.        

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here