तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल; मराठा आरक्षणावरून शिवेंद्रसिंहराजेही आक्रमक

सातारा :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध घडामोडी घडत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय पक्ष एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. अशातच भाजप नेते व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेही आक्रमक झालेले आहेत. ‘सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाहीतर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झालं असं बोललं जातं आता आपण एकत्र आलो नाही तर आपलं दुसरं सामाजिक पानिपत होईल’, असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा तरुण-तरुणींमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे असं सांगत असतानाच राज्य सरकारने एमपीएसीच्या मेगा भरतीसह इतर विषयांमध्ये गडबड करु नये.

मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. त्याची गरज आहे. वेगवेगळे लढण्याची चूक कुणीही करु नये. आपण वेगळे लढलो तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते असंही शिवेंद्रराजेंनी म्हटलं आहे. मराठा समाज कधीही एकत्र येत नाही असं बोललं जातं. मराठा समाजात दुफळी असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असेही त्यांनी अधिक माहिती सांगताना स्पष्ट केलं.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here