पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान, चिराग पासवान यांच्यावर संशय; ‘त्यांनी’ केला आरोप

पटना :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणूक चर्चेत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विविध आरोप प्रत्यारोप केले जात आहे. निवडणुकीत उतरलेले सर्वच पक्ष एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच ‘लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे कट-कारस्थान आहे’, असा धक्कादायक आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षाने केला आहे.

तसेच या मृत्युनंतर रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांचे वर्तन संशयास्पद आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. या आरोपामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते दानिश रिजवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. आणि दानिश यांनी मोदींकडे रामविलास पासवान यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

या दरम्यान दानिश रिजवान यांनी म्हटले आहे की, रुग्णालयात उपचार सुरु असताना पासवान यांच्या भेटीची केवळ तिघांनाच परवानगी का होती? रामविलास पासवान यांच्या मृत्यूमागे चिराग पासवान यांनी कट रचला आहे, त्यांची भूमिका संशयास्पद आहे.

यानंतर “रुग्णालयात असताना इतकी काळजी का नाही दाखवली?, जिवंत असताना त्यांची भेट घेण्यासाठी का कोणी कष्ट घेतले नाहीत?”, असा सवाल चिराग यांनी उपस्थित केला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here