केंद्र सरकार लवकरच आणणार आणखी एक मदत पॅकेज; वाचा काय म्हणालेत वित्त सचिव

दिल्ली :

कोरोनाकाळात आलेल्या बेरोजगारी आणि लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकटांची कुर्हाड कोसळली होती. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारने विविध माध्यमातून मदत करून सर्वाना आर्थिक संकटातून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठे आर्थिक पॅकेज दिले होते. त्यानंतर आता पुन्हा मोदी सरकार अजून एक मोठं आर्थिक पॅकेज देणार असल्याचे समजते. तरुणांचा व्यवसाय आणि रोजगार परत मिळवण्यासाठी सरकार आणखी एक मदत पॅकेज आणू शकते. अद्याप या पॅकेजचे स्वरूप काय असेल आणि हे पॅकेज कधी दिले जाणार, याविषयी कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

सरकार भू-स्तरापर्यंत परिस्थितीवर सतत नजर ठेवत आहे. यासह अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आणि त्या क्षेत्राच्या अनुषंगाने मदत देण्याचे नियोजन आहे. ते म्हणाले की, आम्ही वेळोवेळी उद्योग संस्था, व्यापारी संघटना, विविध मंत्रालयांकडून सूचना घेतो आहोत, अशी माहिती वित्त सचिव अजय भूषण पांडे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केली की, हे पॅकेज येण्यासाठीची निश्चित मुदत काय असेल ते सध्या सांगू शकत नाही, परंतु हो सरकार यावर काम करत आहे आणि पुढील प्रक्रियेवर चर्चा सुरू आहे.  अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे. शासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था विकासाकडे वाटचाल करत आहे. याशिवाय ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 105,155 कोटी रुपये झाले आहे, जे मागील वर्षाच्या याच महिन्यात वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी अधिक आहे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here