‘या’ बँकेच्या व्याजदरात घट; गृहकर्जदारांना मोठा दिलासा

मुंबई :

सध्या आर्थिक संकटे सगळ्यांसमोरच आहेत. अशातच बांधकाम व्यावसायिकांनी घरे विकण्याच्या हेतून दर कमी केलेलं आहेत. तसेच आता एका मोठ्या बँकेने आपल्या गृहकर्जाचे व्याजदर कमी केले आहेत. आता युनियन बँकेनेही गृहकर्ज स्वस्त केले आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाने गृह कर्जाच्या विविध प्रकारांचे व्याजदर कमी केले आहेत.

याआधीही स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा अशा अनेक मोठमोठ्या बँकांनी गृहकर्ज तसेच ईतरही कर्जाचे व्याजदर कमी केलेले आहेत. 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्ज घेतलेल्यांच्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात करण्यात करण्यात आली आहे. तसेच महिला अर्जदारांना अशा कर्जावरील व्याजदरामध्ये 0.05 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. अशा प्रकारे महिला अर्जदारांचे व्याज 0.15 टक्क्यांनी स्वस्त असेल, असे बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सणासुदीचा हंगाम पाहता, किरकोळ आणि एमएसएमई सेगमेंटवर लक्ष केंद्रित करून अनेक वित्त पुरवठा मोहिमा सुरू केल्या आहेत. कर्जदार बँकेने दिलेल्या कमी व्याजदराचा फायदा घेतील आणि कर्ज घेतील, अशी आशा बँकेने या सुविधा देताना व्यक्त केली आहे. बँकेने गृहकर्जाची प्रक्रिया शुल्क, वाहन आणि शैक्षणिक कर्जावरील प्रक्रिया शुल्कही कमी केले आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here