बोलताना अडखळणाऱ्या मुलाला तेव्हा सगळ्यांनी नाकारले, आज आहे हजारो कोटींचा मालक; वाचा, अद्भुत संघर्ष

आजवर आपण संघर्षांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील. अगदी आपल्या आई-वडिलांच्या सुद्धा… म्हणजे कुठेतरी पोटाला चिमटा काढून शिकवलं, मोठं केलं. संघर्ष सगळ्यांनाच असतो. परंतु त्याच्यातली दाहकता, त्याग आणि त्यात गेलेला काळ यावरून त्या संघर्षाचा हिरो ठरत असतो.

रोवन एटकिन्सनचा अमेरिकेच्या डरहम येथे शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शेती करण्याला काही पर्यायच नव्हता. लहान वयात काही गोष्टी मनाशी कोरल्या गेलेल्या असतात. अशीच एक गोष्ट शेतीत ट्रॅक्टर चालवत असताना मनाशी कोरली गेली. लहान वयातच त्याने जगातील सर्वात महागड्या गाड्या आपल्यापाशी असण्याचे स्वप्न त्यांनी पहिले होते. अभिनयाची प्रचंड आवडत असताना रोवन एटकिन्सन नावाच्या एका तरुणाने ऑक्सफर्डमधील क्वींस कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग केलं. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने अभिनय करण्याचा प्रयत्न केला. मात्र जन्मजात स्पीच डिसॉर्डर आणि अडखळत बोलण्याच्या समस्यामुळे कुणी त्याला उभाही करत नव्हतं. दिवस संघर्षाचे होते. अभिनय करायचा असल्यावर स्पष्ट आणि थेट बोलता येणे गरजेचे असते मात्र ते रोवनकडे नव्हते. त्याच्या बेसिकमध्येच गडबड होती परंतु तो थकला नाही. नेहमी नवनवे प्रयोग करणाऱ्या रोवनला तु वेड्यासारखं अभिनय करतोस तु कधीच अभिनेता होऊ शकणार नाहीस” अशी अपमानास्पद वागणूक मिळाली. नंतर तो प्रचंड निराश झाला. सातत्याने मिळत असलेल्या नकारामुळे स्वतःच काहीतरी नवं उभा करावस वाटलं आणि अखेर रोवनने स्वतःचा शो काढला आणि त्या शोचे नाव होते Mr. Bean. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांवरच आपल्या अभिनयाची मोहिनी घालणारा मिस्टर बीन.

ज्या लोकांनी रोवनला अभिनयासाठी नाकारले आज त्याच लोकांना अभिनयाच्या बाबतीत कितीतरी मागे टाकून रोवन पुढे गेले आहेत. मिस्टर बिनच्या जीवावर रोवन यांनी जवळपास ८ हजार कोटी रुपयांची संपत्ती कमावली. मात्र आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. आजही ते साधे राहणे पसंत करतात असे असले तरी रोवन यांनी आपले लहानपणीचे स्वप्नही पूर्ण केले.        

रोवन यांना लक्झरी गाड्यांचं कलेक्शन करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे जगभरातील महागड्या गाड्यांचा ताफा आहे. यात मॅकलोरेन एफ१ ही गाडीही आहे. १९९० च्या सुरुवातीला या गाडीची किंमत जवळपास ५ लाख ४० हजार यूरो एवढी होती. आज ही गाडी विकत घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर गाडीची किंमत ८० ते १०० कोटी रुपये एवढी आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here