अबबब…‘कोरोनिल’ विक्रीतून ‘पतंजली’ मालामाल; अवघ्या ४ महिन्यात कमावले ‘एवढे’ कोटी

दिल्ली :

पतंजली कंपनीची निर्मिती असलेल्या कोरोनिल या औषधावरून बरेच वाद झाले होते. या औषधामुळे कोरोना बरा होतो, असा दावाही पतंजली समूहाचे बाबा रामदेव यांनी केला होता. त्यानंतर आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव आणि पतंजलीची चांगलीच कानउघडणी केली. त्यानंतर मात्र पतंजली माघार घेतल्याचे समजत होते. मात्र आताच समजलेल्या वृत्तानुसार यांच्या ‘पतंजली’नं केवळ चार महिन्यांच्या कालावधीमध्ये ८५ लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. यात विशेष गोष्ट ही आहे की, अवघ्या ४ महिन्यात कंपनीने या औषधाच्या जीवावर अंदाजे २४१ कोटींची कमाई केली आहे.

जगभरात कोरोनावर लस शोधण्याची मोहीम सुरु असताना रामदेव बाबांनी हे औषध लौन्च करत सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. करोनावरील आयुर्वेदिक औषध असा कोरोनिलचा प्रचार कंपनीकडून करण्यात आला होता. तसेच कोरोनिलची निर्मिती करण्याआधी सर्दी, खोकला, ताप आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध बनवण्याचा परवाना सरकारकडून घेतला होता. मात्र आयुष मंत्रालयाने आक्षेप घेतल्यावर त्यांनी या औषधाचा प्रचार थांबवला. अद्यापही हे औषध कोरोनावर किती प्रभावी आहे, याविषयी माहिती नाही. असे असले तरी २३ जून ते १८ ऑक्टोबरदरम्यान एकूण २३ लाख ५४ हजार कोरोनिल किटची विक्री झाल्याची माहिती पतंजली कंपनीने दिली आहे.

‘पतंजली’चे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी औषधाच्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले होते नकी, आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या करोनाचं औषध म्हटलं नाही. यापूर्वी ‘पतंजली’ने ‘कोरोनिल’ या नावाचा वापर केल्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायायलयाने कंपनीला १० लाखांचा दंड केला आहे. तसेच कंपनीने या शब्दाचा वापर बंद करण्याचा आदेशही कंपनीला दिला होता.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here