नवरा-बायकोच्या निखळ नात्यावरील हे विनोद वाचून आवरणार नाही हसू; हसा चकटफू

1. अरेंज मॅरेज म्हणजे
गुपचूप भांडी घासणे
लव्ह मॅरेज म्हणजे
प्रेमाने भांडी घासणे
पण भांडी घासावी लागतातच

2. बायको – दोन किलो वाटाणे घेऊ का?
नवरा – हो घे ना
बायको – तुझा सल्ला नाही मागितला रे, यासाठी विचारतेय की, तू इतके सोलू शकशील की नाही, का कमी घेऊ?

3. बायको – चहा बनवू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – आलं घालून का?
नवरा – ओके
बायको – पुदीना घालू का?
नवरा – हा ठीक आहे
बायको – तुळस आरोग्यासाठी चांगली असते
नवरा – एक काम कर मोहरी आणि जिरे घालून त्याला फोडणी पण दे आता

4. बायको – अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना मला भीती वाटते
नवरा – हा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल

5. बायको – अहो ऐकलं का आपलं लग्न लावणारे भटजी वारले
नवरा – एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळणारच होतं

6. बायको – माझं नशीबच फुटकं म्हणून तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं
नवरा – मी नक्कीच मूर्ख आहे कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा मूर्खपणा माझ्या हातून घडला 

7. नवरा आपल्या चिडलेल्या बायकोला रोज फोन करतो
सासू – तुला किती वेळा सांगितलं की ती आता तुझ्या घरी येणार नाही, मग रोज का फोन करतोस?
जावई – ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

8. भारतीय पत्नी अतिशय संस्कारी असते. ती कधीच आपल्या नवऱ्याला सगळ्यांसमोर ‘अरे गाढवा’ ‘ओय गाढवा’, ‘ऐक अर्थात सुनो गधे’ असं म्हणत नाही.
त्याऐवजी ती संक्षिप्तमध्ये ए. जी./ओ. जी./सुनोजी असं म्हणते

9. बायको – कशी दिसते मी
नवरा – एकदम प्रियांका चोप्रासारखी दिसतेस 
बायको – खरंच? डॉनमधली की क्रिशमधील?
नवरा – बर्फीवाली
मग काय मेरी कॉम बनून नवऱ्याला धू धू धुतलाय बायकोने 

10. सर्वात छोटा जोक 
नवरा – मला कविता आवडतो
बायको – मला पण विनोद आवडतो 

11. आळशी बायको आणि समजूतदार पती 
याचा अर्थ संध्याकाळी खिचडी 

12. एकदा नवरा बायको खूप भांडत असतात
थोड्या वेळाने रागात बायको नवऱ्याच्या अंगावर लुंगी आणून फेकते
बायको – बदला लुंगी 
नवरा – घाबरत …हे तू मराठीत बोललीस की हिंदीत?

13. मे महिना भारीच असतो 
कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुष  असतो 
तर कोणी आपलं जुनं प्रकरण परत गल्लीत माहेरी आलंय म्हणून खुष असतो

14. सुखी संसाराचे तीन महत्त्वाचे शब्द
हिला विचारून सांगतो 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here