वाढदिवस विशेष; शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या या ११ रंजक गोष्टी; वाचून वाटेल आश्चर्य

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलेय. आज त्याचा वाढदिवस आहे. बॉलिवुडच्या ‘किंग खान’चा आज 55वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आपण त्याच्या बद्दलच्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. आजही त्याचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुखने आतापर्यंत १०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

 1. शाहरुखची आयुष्यातील पहिली कमाईसुद्धा सिनेमासृष्टी क्षेत्रातीलच होती.पंकज उधासच्या एका कार्यक्रमात शाहरुखने स्वयंसेवक(कार्यकर्ता) म्हणून काम केलं. काम पूर्ण झाल्यावर त्याला या कामासाठी पन्नास रुपये मानधन मिळालं होतं. हीच त्याची आयुष्यातील पहिली-वहिली कमाई होती. या पैशांतून शाहरुख ट्रेननं आग्र्याला गेला.
 2. अनेक व्यवसायात अयशस्वी झालेले त्याचे वडील दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची 1974 पर्यंत खानावळ चालवायचे आणि शाहरुख त्यांना सोबत करायचा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाशी शाहरुखचं जवळचं नातं होतं. तिथूनच त्याला अभियानाचं बाळकडू मिळालं.
 3. शाहरुख आणि गौरीची भेट एका डान्स पार्टीत झाली होती. तेव्हा गौरी शाळेत शिकत होती. तिचे वडीलही सदर भागात लष्करात अधिकारी होते. एकात्या पार्टीतील भेटीनंतर पुढे हे नातं अधिक जवळचं झालं. गौरीसाठी शाहरुखने एक संपूर्ण रात्र रेल्वे स्टेशनवर काढली होती. 25 ऑक्टोबर 1991 ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले.
 4. शाहरुखने काम खूप केले पण त्याला पहिला ब्रेक मिळाला तो मराठी अभिनेत्रीबरोबर. तो रेणुका शहाणेबरोबर 1989-90 मध्ये आलेल्या ‘सर्कस’ या मालिकेत.
 5. ही मालिका शाहरुखच्या आईला दवाखान्यात दाखवली गेली. मात्र त्या इतक्या आजारी होत्या की त्यांनी शाहरुखला ओळखले सुद्धा नाही. एप्रिल 1991 मध्ये त्यांचं निधन झालं. आईच्या निधनानंतर ते दुःख विसरण्यासाठी शाहरुख मुंबईत आला आणि आजवर त्याने रचलेला इतिहास आपण पाहतच आहोत.   
 6. राहुल या नावाने आजवर शाहरुखने तब्बल ९ चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  ‘राहुल, नाम तो सुना होगा’ हे वाक्य फक्त शाहरुखसाठीच बनलं आहे, असं चेष्टेत म्हटलं जातं. ‘डर’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘जमाना दिवाना’, ‘यस बॉस’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ अशा किमान 9 चित्रपटांत शाहरुख राहुल बनून प्रेक्षकांसमोर आला आहे.
 7. राहुल नंतर राज या नावानेही शाहरुख अनेक चित्रपटातून आपल्या समोर आला.  ‘राजू बन गया जेंटलमॅन’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘मोहब्बतें’, ‘रब ने बना दी जोडी’ 
 8.  तुम्हाला जाणून खरोखर आश्चर्य वाटेल की, ‘अपुन बोला, तू मेरी लैला’ हे गाणं स्वतः शाहरुखनं गायलं आहे. हे गाणं ‘जोश’ चित्रपटातील आहे. या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.
 9.  हॉकी आणि फूटबॉलचा शाहरुख चाहता आहे. आजही पन्नाशी ओलांडली असली तरी त्याचे खेळाविषयीचे प्रेम कमी झालेले नाही. IPLच्या कोलकाता नाईट राइडर्स टीमचा ‘किंग खान’ मालक आहे. आज या वयातही शाहरुखला खेळण्यांचं प्रचंड वेड आहे. 
 10. 2008 साली ‘न्यूजवीक’ मॅगझिननं जगातल्या सर्वाधिक प्रभावशाली 50 लोकांच्या यादीत शाहरुखला 41वं स्थान दिलं. बराक ओबामा यात सगळ्यांत वरच्या स्थानावर होते.
 11. फोर्ब्स मासिकाच्या सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या जगातल्या टॉप 10 अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख 8 व्या क्रमांकावर आहे.

संपादन :- विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here