‘या’ कंपनीची स्मार्टफोन क्षेत्रात एन्ट्री; अवघ्या 4 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार मोबाईल

मुंबई :

स्मार्टफोन क्षेत्रात सध्या प्रचंड स्पर्धेचे युग तयार झालेले आहे कारण कोरोनादरम्यान आणि नंतर ओढवलेल्या आर्थिक संकटात दोन क्षेत्रात उलाढाल चालू होती. त्यापैकी पाहिलं म्हणजे औषध क्षेत्र आणि दुसरे म्हणजे मोबाईल क्षेत्र होय. अशातच या मोबाईल क्षेत्रात अजून एक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी उतरली आहे. एन्ट्रीलाच या कंपनीने धमाका करत अवघ्या ४ हजारांपेक्षाही कमी किंमतीत मोबाईल देण्याची तयारी दाखवली आहे.

आपणा सर्वांना परिचित असलेली Yahoo या कंपनीने Moblie जगतात प्रवेश करत नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. याहूने लाँच केलेल्या या फोनचं नाव ZTE Blade A3Y असं आहे. हा स्मार्टफोन ZTE या कंपनीने बनवला आहे. पण Yahoo कंपनीच्या नावावर या कंपनीने स्मार्ट फोन्स विकले जाणार आहेत. ZTE Blade A3Y हा या कंपनीचा पहिलाच स्मार्ट फोन आहे. . या फोनाची यूएसमधील किंमत $50 आहे. भारतामध्ये हा स्मार्टफोन 3,700 रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. 

असे आहेत ZTE Blade A3Y चे फीचर्स :-

  • 5.45 इंचाचा एचडी डिस्प्ले
  • 2 जीबी रैम आणि 32 जीबी स्टोरेज (फोनचं स्टोअरेज 128 जीबीपर्यंत वाढवू शकता)
  • स्क्रीन रेजोल्यूशन 720×1440 पिक्सल आणि 18:9 चा आस्पेक्ट रेशियो
  • स्मार्टफोन अँड्रॉईड 10 वर काम करतो.
  •  ग्रेप्स जेली कलरमध्ये उपलब्ध
  • क्वाड कोर MediaTek Helio A22 प्रोसेसर

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here