ठाकरे सरकारने केला 15 मोठ्या कंपन्यांसोबत करार; 35 हजार कोटींची गुंतवणूक, ‘एवढे’ मिळतील रोजगार

मुंबई :

सध्या जगभरातील कोरोनाचा प्रभाव संपला नसला तरीही कोरोनाकाही अंशी आटोक्यात आल्याने लोकांनी पुन्हा पाहिल्याप्रमाणे काळजी घेत कामांना सुरुवात केल्याची चित्रे आहेत.परिणामी रुतलेल्या आर्थिक चक्राला गती मिळाली आहे असे दिसून येते आहे. या दरम्यान महाविकास आघाडी सरकारने व्यवसायाला चालना देण्यासाठी जोरदार सुरुवात केली आहे. मविआ सरकारने राज्यात 35 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा दावा केला असून, या गुंतवणुकीमुळे सुमारे 24 हजार लोकांना रोजगार मिळेल, अशी सरकारला अपेक्षा आहे. मविआ सरकार आज जवळपास 15 मोठ्या कंपन्यांशी सामंजस्य करार करणार आहे.

कोणत्या कंपन्यांशी होणार सामंजस्य करार :-

  • मित्सुबिशी इलेक्ट्रिक
  • ब्राइट सिनो
  • नेट मॅजिक
  • एसटीटी डेटा सेंटर
  • कोल्ट डेटा सेंटर
  • ओरिएंटल ऍरोमेटिक ईटी
  • एव्हरमिंट लॉजिस्टिक
  • मालपाणी वेअरहाऊसिंग

सध्याचे सरकार गुंतवणूक करण्यास तयार असलेल्या कंपन्यांशीच करार करीत आहे. ज्यांची जमीन खरेदी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे किंवा पाइपलाइनमध्ये केली जाते आहे, त्यांच्याशी करार करण्यास सरकार प्राधान्य देत आहे. गुंतवणुकीत वाढ झाल्याने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही रोजगार वाढणार आहेत, अशी माहिती एका उच्चअधिकाऱ्याने दिली आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here