आता सर्व भारतीय अॅप्स मिळणार एकाच प्लॅटफॉर्मवर; वाचा, काय आहे विषय

दिल्ली :

स्वदेशी चळवळीचे महत्व आता लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे सध्या देशभरातील लोकांमध्ये स्वदेशी चळवळीने जोर धरला आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन पुढे आहे म्हणून त्यांचे अनेक अॅप्स लोकप्रिय होते. मात्र केंद्र सरकारने असुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्या अॅप्सवर बंदी आणली. मग स्वदेशीने जोर धरला आणि आता Mitron TV च्या पुढाकाराने आता सर्व भारतीय अॅप्स मिळणार एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत. यात बिझनेस, ई-लर्निंग, न्यूज हेल्थ, शॉपिंग, गेम्स, इंटरटेनमेंट आणि सोशल यांसारखे अनेक अॅप्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

तसेच Mitron ने ‘आत्मनिर्भर अॅप्स’ (Atmanirbhar Apps) लॉन्च केले आहे. त्यात शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग अॅप सुद्धा आहेत. आता तुम्हाला भारतीय अॅप्स शोधण्यासाठी इतर कुठे जाण्याची गरज नाही. सध्या आत्मनिर्भर अॅप्स सध्या अॅनरॉईड युजर्ससाठी सादर करण्यात आला आहे आणि हा गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करता येईल. 

आत्मनिर्भर अॅप्स मध्ये युजर्संना 100 हून अधिक अॅप्सची सुविधा मिळेल. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला पाठिंबा दर्शवणाऱ्या अॅपमध्ये युजर्संना आत्मनिर्भर शपथ घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. हे अॅप डाऊनलोड करुन इंस्टॉल करुन तुम्ही वापरु शकता. त्यासाठी कोणत्याही रजिस्ट्रेशनची गरज नाही.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here