भाजपवासी झालेले ज्योतिरादित्य सिंदिया भरसभेत म्हणाले; काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करा…

भोपाळ :

सध्या मध्यप्रदेशमध्येही पोटनिवडणुका लागलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर तिथेही भाजप आणि कॉंग्रेसमधील नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच एका स्री उमेदवाराला आयटम संबोधल्याने निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कमलनाथ यांना झटका देत त्यांचे स्टार प्रचारक पद काढले. दरम्यान भाजप नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही एके ठिकाणी भर भाषणात चक्क काँग्रेसच्या ‘पंजा’ला मतदान करण्याचं आवाहन केलं. यानंतर व्यासपीठावरील भाजप नेते व पदाधिकारी ज्योतिरादित्य यांच्याकडे पाहतच राहिले.

यानंतर आपल्याकडून गडबडीत असं बोलल्याचं लक्षात येताच आपली चूक लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी चिभ चावली आणि भाजपच्या कमळाला मतदान करण्याचं आवाहन केलं.

नेमकं काय म्हणाले सिंदिया :-

शिवराज सिंह आणि आम्हाला विश्वास द्या, माझी शानदार आणि जानदार डबराची जनता… ३ नोव्हेंबरला हाताच्या पंजाचं बटन दाबलं जाईल. नंतर चूक लक्षात येताच ‘कमळाचे फूल असलेलं बटन दाबणार आणि हाताच्या पंजाला डाबरामधून रवाना करणार’.     

काँग्रेसनं शिंदे यांचा हा व्हिडीओ शेअर करत ‘सिंधिया जी, मध्य प्रदेशची जनता विश्वास देते आहे, की 3 तारखेला हाताच्या पंजाचंच बटन दाबलं जाईल’, असा जोरदार टोला लगावला आहे.

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here