‘ते’ बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला; भाजपचा सणसणीत टोला

मुंबई :

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे झालं आहे. बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत तो मुंबईत होता. बराच काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत, असे विधान काल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केले होते. याच पार्श्वभूमीवर ‘बाळासाहेब होते तेव्हा मुंबई हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता (पवार साहेबांमुळे) तो पुणे झाला आहे…असं बोलून संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला आहे,’ असं भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

पुण्यात बोलताना ‘सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय?’, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला होता. ते म्हणाले की, ‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते म्हणून शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी देखील इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतंय?

संपादन :स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here