‘त्या’ मंत्र्यांची ठाकरे सरकारमधून हकालपट्टी करा, त्यांना धडा शिकवा; मराठा समाजाची आक्रमक मागणी

मुंबई :

सध्या राज्याच्या राजकीय पटलावर मराठा समाजाच्या आरक्षणावरून अनेक घडामोडी घडत आहेत. तसेच त्या अनुषंगाने विविध आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची सरकारमधून हकालपट्टी करा, मराठा समाजाबाबत सातत्याने गरळ ओकणाऱ्या वडेट्टीवार यांना धडा शिकवा’, अशी मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवार यांनी आजपर्यंत अनेक भूमिका घेतल्या. मात्र आताच्या भूमिकेमुळे वडेट्टीवार यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार :-

मराठा समाजावर अन्याय नको, पण ओबीसींवरही अन्याय नको. नोकरीभरतीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरला तर ते योग्यच आहे. नोकर भरतीसाठी ओबीसी तरुणांमध्ये असंतोष वाढतोय. कालच्या कॅबिनेटमध्ये इतर नोकरभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. एका समाजासाठी इतरांवर अन्याय नको.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here