आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार; नक्कीच वाचा आणि पटले तर शेअर करा

 • थोर काय अगर सामान्य काय ! प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही असतेच.
 • दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही, म्हणून दुर्बल राहू नका.
 • ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .
 • नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो.
 • पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
 • प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती घडायला हवी वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी
  प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.
 • प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येतं.
 • भेकड म्हणुन जगण्यापेक्षा शुराचे मरण आधिक चांगले
 • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
 • माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.
 • मोठेपणाची इच्छा असेलतर मोठ्यांची ईर्ष्या व लहानांचा तिरस्कार करु नका.
 • यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास.
 • रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here