रतन टाटांनी दिला उद्योजकांना महत्वाचा सल्ला; म्हणाले…

मुंबई :

‘काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा’ या विषयावर बोलत असताना प्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे रतन टाटा यांनी ‘जग झपाटय़ाने बदलत असून, उद्योजकांनी बदलत्या काळाशी आणि गरजांशी जुळवून घेणे आवश्यक आहे’, असा सल्ला उद्योजकांना दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होत टाटांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना टाटा यांनी म्हटले की, नवोन्मेष आणि सृजनशीलता हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांना देशाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

नेमकं काय म्हणाले टाटा :-

अवकाशयुगीन आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवसाय वाढीसाठी वापर केला पाहिजे. आपण जो व्यवसाय करतो तो केवळ एका देशापुरता मर्यादित नसून, जगाच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करीत असतो. त्या अनुषंगाने प्रत्येकाचे वर्तन आणि आचरण असले पाहिजे. ‘नम्रता’ हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे. केवळ मूल्यनिर्मितीसाठीच नव्हे, तर मानव कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. 

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here