मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा; ‘या’ भाजप नेत्याचा टोला

मुंबई :

राज्यपालांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काही मुद्द्यांवर शरद पवारांशी सल्लामसलत करावी, असे सुचविले. यावरून ‘शरद पवारच सरकार चालवतात, त्यामुळेच त्यांना भेटण्याचा सल्ला दिला असावा, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. नंतर ‘मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतल्यास गैर काय?’, असा सवाल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा’, असा टोला चंद्रकांत पाटलांनी हाणला आहे.

यावेळी पाटील यांनी राऊतांवर सडकून टीका केली. पाटील म्हणाले की, भाजपवर टीका करणे हेच संजय राऊत यांना देण्यात आलेले काम आहे. या कामामुळेच त्यांचे पद टिकून आहे असं म्हणत पाटील यांनी राऊत यांना लक्ष्य केले.

नेमकं काय म्हणाले होते राऊत :-

मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांचा सल्ला घेतल्यास गैर काय? शरद पवार यांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?

संपादन : स्वप्नील पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here