बिहार निवडणुकीत भाजपच्या नावावर आहे ‘तो’ नकोसा विक्रम; वाचा काय आहे विषय

पटना :

सध्या देशाच्या राजकीय पटलावर बिहार निवडणूकींची चर्चा आहे. त्या अनुषंगाने मोठ्या वेगाने बिहारमध्ये घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे, जो भाजपलाही कदाचितच माहिती असेल. सध्या वातावरण राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या बाजूने दिसत आहे. देशभरातही सध्या त्यांच्याच नावाची चर्चा आहे. भाजपला मात्र सभेला लोक गोळा करतानाही नाकी नऊ आल्याचे फोटो समोर आलेले आहेत. कदाचित या वातावरणाचा परिणाम म्हणूनच भाजपच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे. हा विक्रम बंडखोरांच्या बाबतीतला आहे.

असे आहेत बंडखोर :-

  • बंडखोरी केली म्हणून ४३ जणांना भाजपनं घरचा रस्ता दाखवला आहे. यात आजी-माजी आमदारांसह प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. 
  • दुसऱ्या फळीत काम करणारे किंवा जिल्हास्तरीय नेत्यांची बंडखोरी लक्षात घेतल्यास हा आकडा अजूनच फुगत जाईल.
  • भाजपमध्ये पहिल्यांदाच स्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्याच अधिकृत उमेदवारांविरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे.   
  • १८ जागांवर भाजपच्या नेत्यांनी जदयूविरोधात तर जवळपास १० पेक्षा अधिक मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी स्वपक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच आव्हान दिलं आहे.
  • सध्याच्या घडीला तीन डझनहून अधिक नेत्यांनी पक्षासमोरच आव्हान उभं केलं आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here