रिकाम्यापोटी सकाळी चहा पिण्याचे एवढे आहेत तोटे; होतील ‘हे’ गंभीर दुष्परिणाम

भारतातील जवळपास प्रत्येक घरात सकाळी चहा केलाच जातो. चहा म्हणजे भारतीयाचं सर्वात आवडतं पेय आहे. चहा हे हळूहळू शरीरात भिनणारं विष आहे , हे जाणूनही चहावर जीवापाड प्रेम करणारी मंडळी तुम्ही जिथे तिथे दिसतील. सकाळी चहा घेतल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही, असाही एक भारतातील प्रत्येक घरात सापडेल. परंतु तुम्हाला माहिती आहे असायला हवं की सकाळी उठल्या उठल्या काहीही न खाता पहिला चहा पिणं आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.

दुष्परिणाम – 

  • 1) पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते.
  • 2) दिवसाची सुरूवात चहाने केली तरीही कामामध्ये मरगळ जाणवते. चहामध्ये दूध मिसळल्याने अ‍ॅन्टी ऑक्सिडंट्सचा परिणाम कमी होतो. 
  • 3) 6-7 तास काहीही न खाता थेट चहा पिला तर पोटात पित्त वाढते. पोटात अल्सरचा त्रासही वाढतो. 
  • ४) चहा पावडर आणि साखरेमुळे शरीरात चरबी वाढते. परिणामी वजन वाढण्याचा धोकादेखील बळावतो. 
  • ५) रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात प्रोटीन आणि इतर पोषक घटक शोषून घेण्याची क्षमतादेखील कमी होते. शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. 
  • संपादन : संचिता कदम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here