‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन

दिल्ली :

‘जेम्स बॉन्ड’ या प्रचंड प्रसिद्ध पात्राला अजरामर करणारे आणि 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी ‘जेम्स बॉन्ड’ची भूमिका साकारणारे अभिनेते सर शॉन कॉनरी याचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. सर शॉन कॉनरी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

सीन कोनेरी यांनी 1962 ते 1983 एवढ्या प्रदीर्घ काळासाठी जेम्स बॉऩ्डची भूमिका साकारली होती. यामध्ये डॉ. नो, यू अँड ओन्ली लिव्ह ट्वाईस, प्लस डायमंड्स आर फॉरेव्हर आणि नेव्हर से नेव्हर अगेन अशा चित्रपटांचा समावेश आहे.

मूळचे स्कॉटलँडचे असलेले शॉन कॉनरी यांनी जेम्स बाँडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. शॉन कॉनरी हेच पहिल्यांदा जेम्स बाँड हे पात्र रंगवताना रुपेरी पडद्यावर दिसले होते. पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी सलग सात चित्रपटांमध्ये जेम्स बाँड या गुप्तहेराची भूमिका केली.

त्याशिवाय त्यांनी पुढची अनेक दशके चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांना एक ऑस्कर, दोन बाफ्टा आणि तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते, हे विशेष.

त्यांचे इतर गाजलेले चित्रपट :-

मार्नी (1964), मर्डर ऑफ ओरिएंट एक्स्प्रेस (1974), दी नेम ऑफ द रोझ (1986), हायलँडर (1986), हंट फॉर रेड ऑक्टोबर (1990), ड्रॅगनहर्ट (1996), द रॉक (1996)

संपादन : स्वप्नील पवार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here